आमचा इतिहास -

आपल्या महाराष्ट्र राज्याच्या आजच्या प्रगतीत सहकार क्षेत्राचे लक्षणीय योगदान आहे. आपणही "सहकारातून समाजकार्य । आम्ही बांधिले शिरोधार्य" हे ब्रीदवाक्य धारण करून सहकाराचा मूलमंत्र जपत सन १९८७ साली हि संस्था स्थापन केली. त्यावेळी ऐरोली परिसरात नवीन वसाहत वसत होती. एकमेकांशी फारशी ओळख नसतानादेखील २५ वर्ष पूर्वी रु. २२००० /- चे भाग भांडवल व रु. १५००० /- ठेवी जमा करून पतसंस्थेची स्थापना झाली. दआपले सभासद कर्ज १८ कोटी ३९ लाख असून संस्था स्वबळावर समर्थपणे वाटचाल करीत आहे. याचे सारे श्रेय सुरुवातीच्या ३११ सभासदांना जाईल.

दिनांक २ ऑक्टोबर १९८७ रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संस्थेचे उदघाटन झाले आहे. या मागील वाटचाली कडे वळून बघताना अतीव समाधान वाटते. आज संस्थेच्या स्वमालकीच्या दोन जागा आहे व २ शाखा कार्यरत आहेत. सभासद ठेवी ३० कोटी, भागभांडवल १ कोटी ६५ लाख असून बँकेत २० कोटी ३६ लाखांची गुंतवणूक आहे.

एकमेकांचा तितकासा परिचय नसताना त्यांनी संस्थेचे सभासदत्व स्वीकारले व प्रारंभपासून विश्वास, धीर आणि प्रोत्साहन दिले. पुढे हे सर्व सार्थ करण्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांनी अपार निष्ठेने काम केले हे हि तितकेच सत्य आहे. कोणत्याही क्षेत्रात स्पर्धा असतेच. या स्पर्धात्मक युगात शिवसमर्थ पतपेढीचे नाव सुरुवातीपासूनच आजपर्यंतर विश्वासपात्र ठरले आहे. सभासद, ठेवीदार, कर्जदार व सर्व हितचिंतक यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची नेहमीच काळजी घेत आलो व यापुढे हि घेत राहणार आहोत.