कर्ज -

एक चांगल्या पतसंस्थेचे कर्तव्य पार पाडताना कर्जाचे कारण, तारण व परतफेड क्षमता ह्या बाबी लक्षात घेऊनच संस्था कर्ज देते. संस्थेच्या कर्ज प्रकार वैशिष्ठ्ये पुढील प्रमाणे - कमी व्याज दर - ९% ते १५ % दरसाल सरळ व्याजाने लोन (कर्ज ) दिले जाते.

सरळ व्याज (दैनंदिन व्याज) पद्धत - सरळ व्याज पद्धतीमुळे कर्ज रोजच्या रोज कमी होत जाते. कर्ज रक्कम महिन्यातून कितीहि वेळा भरता येते. छुपे खर्च तसेच अतिरिक्त शुल्क कर्जदारास आकारले जात नाही.तसेच कोणत्याही प्रकाचे कमिशन कर्जदारांकडून घेतले जात नाही.

घर तारण कर्ज व सोने तारण कर्जावर कमीत कमी प्रोसेसिंग चार्जेस आकारले जातात. प्री - क्लोजर चार्जेस म्हणजेच मुदतीआधी कर्ज फेडल्यास कोणत्याही प्रकारचा चार्ज आकारला जात नाही.

कर्ज परतफेड कालावधी ३६ महिने ते १८० महिने पर्यंत कर्ज रक्कमेनुसार व कर्जदारांची परतफेड क्षमते नुसार दिला परतफेड कालावधी दिला जातो.